Sunday, May 1, 2011

|| किल्ले कोकणदिवा ||

जिल्हा:- पुणे
किल्याचा प्रकार:- गिरीदुर्ग
किल्याची उंची:- ८०० मीटर
श्रेणी:- सोपी 


रायगडच्या उत्तरेला सरळ रेषेत अदमासे ६-७ कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या धारमाथ्याशी, किंचित सपाट माथ्याचा एक डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ८०० मीटर च्या आसपास आहे. इथून घडणारे रायगडचे भव्य दर्शन अचंबित करते. डाव्या बाजूचे भवानी टोक अन् उजव्या बाजूचे टकमक टोक असा रायगडचा विस्तार येथून जाणवतो. नित पहिले तर श्रीवाडेश्वर (जगदीश्वर) मंदिर आणि राजसभेचे मुख्य प्रवेशद्वार (नगारखाना) देखील निट दिसतो. अर्थात दुर्बिण असेल तर ते आणखीन नीट आणि स्पष्ट दिसते.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:-


कोकणदिवा जरी रायगडच्या घेऱ्यात असला तरी तो आहे पुणे जिल्ह्यात. रायगडच्या घेऱ्यातील संदोशी गावातून कावळ्या घाटाने चढू लागले कि आधी लागते कावळ्या-बावळ्या ची खिंड, तिथूनच उजव्या हाताला कारवीच्या झाडीतून घुसत घुसत कोकणदिव्याकडे जाता येते. ऐन शिखराखाली आहे भलीमोठी गुहा अन् त्याच्याशेजारीच आहे थंडगार शीतल पाण्याचे टाके. थोडे कातळारोहण करून आपण कोकणदिव्याच्या माथ्यावर पोहोचतो. वरून पाहिलेले दुर्ग दुर्गेश्वर रायगडाचे दृश्य अप्रतिम असते. एकदिवसात किल्ला बघून पुण्याला येता येते.

गडावर जाण्यायेण्याच्या वाटा:-


रायगडच्या परिसरावर लक्ष ठेवायला कोकणदिव्याइतकी उत्कृष्ट अन्य जागा नाही. पुण्याहून पानशेतला यावे तेथून बोटीने किंवा रस्त्याने गोंडखल गावी यावे. पुढे घोळमार्गे गारजाई वाडीतून कोकणदिव्यापर्यंत चालत यावे लागते.

मार्ग:-

मुंबई-पुणे-पानशेत-घोळ-गारजाईवाडी
पुणे-पानशेत-घोळ-गारजाईवाडी (७५ कि.मी. अंतर)

टीप:- आता घोळ गावापर्यंत डांबरी रस्ता झाल्यामुळे घोळ गावापर्यंत बाईक जाऊ शकतात. गाड्या घोळ गावामध्ये लावाव्यात. घोळ गावापासून गारजाईवाडी हे अंतर ३०-४५ मिनिटात चालत पोहोचता येते.

राहण्याची सोय व जेवण्याची:-
गडावर राहण्यासाठी मोठ्या मोठ्या दोन गुहा आहेत त्यामध्ये १०-१५ जणांची सोय होऊ शकते. नाहीतर मुक्कामाला गारजाई वाडी मधील मारुती मंदिरात सुद्धा झोपू शकतात. जेवायची
सोय स्वतःचे स्वतः करावी.

आजूबाजूचा परिसर:-
रायगड
तोरणा
लिंगाणा
कावळ्या-बावळ्या ची खिंड
पानशेत धरण
सांदोशी धरण ई.
(Source : Internet)

No comments:

Post a Comment