ढाक भैरी ...ढाक बद्दल सांगयचं म्हणलं तर अतिशय सुंदर,शांत,पण तेवढाच चित्तथरारक गड आहे...ढाक भैरी करणं हे जेवढं अवघड आहे तेवढंच सोप्पं हि आहे...आम्ही ढाक ला जाण्याच्या आधी मला खूप लोकांकडून ढाक बद्दल वेग वेगळं एकयला मिळाला...सगळ्यांचं म्हणणं असा होता कि ढाक करणं हे कोण्या सोम्या गोम्याच काम नाही...अनेक ब्लॉग वर पण ढाक बद्दल असा काही वाचला कि जुने त्यांनी ढाक ची भीती निर्माण करण्यासाठी हे लिहिला आहे कि काय असा कधी कधी वाट्याचं...मनात आलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता फक्त एकच देऊ शकतो तो म्हणजे ढाक !! म्हणून ढाक ला जायचं ठरवला..मुळात ट्रेककिंग ची आवड असल्यामुळे वेळ काढावा लागत नाही तो आपसूक निघतोच...असंच रविवारी ढाक ला जायचं ठरलं...ढाक ला जाताना ढाक च लांबून होणारं दर्शन हे थोडा धडकी भरवणारच आहे..लांबून दिसणारं ते कातळ चढ्याच कसा असा प्रश्न पडतो कारण वर जायला वाट दिसतच नाही...पुढे एका जंगलातून वाट काढत आम्ही ढाक च्या प्याथ्याशी पोहचलो..जाताना वाटेत "महिलांना सक्त मनाई." असे फलक लावलेले दिसले...पुढे आल्यावर एक नाळ लागते ज्याच्या मध्यभागी उभे असता डावीकडे भैरीचा कडा व डावीकडे प्रचंड ढाक दिसतो..भिंतीच्या कडेनी पुढे सरकत...नंतर सरळ वरती जायला दगडांची दोर्यांची मदत घ्यावी लागते...आपण ढाक चढताना मागे दरी व आपल्या पुढे ढाक असा दृश्य असता...ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी ढाक करू नये असं माझं मत आहे..ढाक च वर्णन करायचं झालं तर एक ब्लॉग पुरणार नाही...आणि एवढं कोण वाचेल असं पण मला वाटत नाही...;) ..पण एक अप्रतिम असं गड आणि ट्रेक कशाला म्हणतात हे फक्त ढाक ला गेल्यावरच कळतं ..ट्रेककेरस नि एकदा ढाक जरूर करावा ..ढाक वरून दिसणारं निसर्गच सौन्दर्य हे अवर्णनीय आहे..काही गोष्टी अश्या असतात कि त्या शब्धात सांगणं खूप अवघड असतं.. पण मी इथे एकच सांगतो मला असं वाटलं जर मनात इच्चा असेल आणि निसर्गच सौंदर्य बघ्याची इच्चा असेल तर ढाक ला जरूर जा....!
ढाक
ढाक
-श्रीराम गद्रे .
ढाक
ढाक
-श्रीराम गद्रे .





No comments:
Post a Comment