Friday, December 17, 2010

ट्रेकिंग म्हणजे पिकनिक नव्हे ...!!

"प्रमोद मांडे" यांनी आताच्या सर्व ट्रेकर्स ला ट्रेकिंग ची खरी जाणीव करून देण्यासाठी लिहिलेला हा उत्तम लेख !!




ट्रेकिंगच्या माध्यमातून, डोंगर-द-या पायाखाली घालत, पायवाटांनी मनमुराद
भटकंती केल्यावरच महाराष्ट्राचा इतिहास, निसर्ग, जीवनपद्धती, श्रद्धा,
सामाजिक स्थिती, संस्कृती आदींचा परिचय जवळून होऊ शकतो.

महाराष्ट्र पर्यटनप्रिय लोकांचा प्रदेश आहे तसेच देश-विदेशातील लोकांसाठी
पर्यटनप्रिय प्रांत आहे. महाराष्ट्राची खरीखुरी ओळख करून द्यावयाची असेल
तर सर्वसाधारण सहली काढून या प्रांताची खरी ओळख होणार नाही. ट्रेकिंगच्या
माध्यमातून, डोंगर-दऱ्या पायाखाली घालत, पायवाटांनी मनमुराद भटकंती
केल्यावरच महाराष्ट्राचा इतिहास, निसर्ग, जीवनपद्धती, श्रद्धा, सामाजिक
स्थिती, संस्कृती आदींचा परिचय जवळून होऊ शकतो. आणि म्हणूनच भारतातील
सर्वात जास्त ट्रेकिंग गट बहुधा महाराष्ट्रातच असावेत.


गेल्या २५-३० वर्षात अनेक ट्रेकिंग ग्रूपची स्थापना झाली आहे. आजही ही
मंडळी त्याच उत्साहाने व जोमाने ट्रेकिंग छंद म्हणून जोपासत आहेत.
गिरिशिखरांपासून हिमशिखरांपर्यंत गवसणी घालत आहेत. सामुदायिकतेची व
सहकार्याची तत्त्वे पाळून सांघिक भावना जपत भटकंतीचा वसा सांभाळत आहेत.
असं असताना अलिकडे बरेचदा काही वेगळं चित्र समोर आल्यावर एकदम दातांखाली
खडा आल्यासारखं वाटतं. युवक-युवतींची अनेक टोळकी ज्या पद्धतीने द-याखो-
यांत ट्रेकिंगच्या नावाखाली हुंदडतात ते पाहून मन विषण्ण होतं. इतिहासाचा
वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांवर गेल्यावर तिथला धिंगाणा, मस्ती
पाहिल्यावर, आपण एखाद्या समुद्रकिनारी फिरायला तर आलो नाही ना, अशी शंका
मनात येते.

 ऐतिहासिक वास्तूंवर, गडकिल्ल्यांच्या प्रवेशद्वारांवर लैला-मजनू
स्टाइलने ‘हृदय-बाण’ खडूने रंगवून स्वत:ची नावं लिहिणं, मुक्कामाच्या
ठिकाणी विनाकारण गोंगाट करणं, उरलंसुरलं खाणं, खरकटं, कागद,
प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादी वाट्टेल तसं इतस्तत: फेकून देणं, दारूच्या
पार्ट्या, स्थानिक गावकऱ्यांशी अरेरावीने बोलणं, असं बरंच काही या
बेदरकार तरुणाईबद्दल सांगता येईल. कदाचित गडकिल्ल्यांवर जाण्याचा सुलभ
मार्ग, वाहनांची सहज उपलब्धता अत्यंत बेफिकीर वृत्तीही याला कारणीभूत असू
शकेल. ट्रेकिंग म्हणजे हिलस्टेशनला भेट देऊन मौजमजा करण्यासाठी केलेली
पिकनिक नक्कीच नाही. याच बेलाग गडकोट, किल्ल्यांच्या साक्षीने छत्रपती
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सह्याद्रीतील
अनेक मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली, राजांना रायगडावर
राज्याभिषेकही झाला आणि म्हणूनच सह्याद्रीच्या कुशीतील गडकोट आपण
दैवतासमान पवित्र मानायला हवेत.
 या तरुणाईच्या उत्साहाला व जोशाला योग्य दिशा देण्याची, मार्गदर्शन
करण्याची तसेच ट्रेकिंगबद्दल गैरसमज दूर करण्याची जबाबदारी जुन्याजाणत्या
ट्रेकिंग संस्था आणि अनुभवी गिर्यारोहकांची आहे. ट्रेकिंग हा क्रीडा
प्रकार स्पर्धात्मक नाही. अनुभवी संस्थांच्या मार्गदर्शनाखाली
महाविद्यालयीन स्तरावर ट्रेकरचे ग्रूप स्थापन केल्यास या उत्साहाला योग्य
दिशा मिळू शकते, बऱ्याच गैरप्रकारांना आळा बसू शकतो व तरुणांमध्ये सक्षम
नेतृत्वगुण निर्माण करण्यासाठीही त्याचा फायदा होऊ शकतो. प्रत्येक
ट्रेकच्या प्रारंभीच तेथील रहिवाशांशी संपर्क साधावा, आदराने बोलावं,
त्या परिसराची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती करून घ्यावी. शक्य असल्यास
त्यांना सोबत येण्याची विनंती करावी. एकूणच, त्यांच्याशी जवळीक साधावी.
निसर्गापुढे नतमस्तक होऊनच ट्रेकिंगला प्रारंभ करावा. डोंगर, गड-
किल्ल्यांवर जाण्याचा मार्ग कितीही सोपा वाटत असला तरी हलगर्जी, जरासा
बेसावधपणा घात करू शकतो. अपुऱ्या साधनसामग्रीसह ट्रेकला जाणं टाळावं. या
क्रीडाप्रकारात कोणतीही हार-जीत नाही. माथा गाठल्यावर आपण कोणावरही मात
केलेली नसते वा विजयही प्राप्त केलेला नसतो. परंतु मिळणारा आनंद अवर्णनीय
असतो. प्रारंभापासूनच उत्तम सवयी, खबरदारी, संयम व शिस्त अंगी बाणवल्यास
अहंभाव आपोआप निघून जाऊन तुम्ही भटकंतीचा आनंद अगदी उतारवयापर्यंत मिळवत
राहाल याची हमी मी देतो!

 
-प्रमोद मांडे

Sunday, December 5, 2010

Jaygad Fort


Last village in Ratnagiri tehsil is Jaygad. After crossing the creek in the village, one reaches the Guhagar tehsil. Jaygad is the natural port and famous since ages. When major transportation was by sea – routes. This is one of the rare ports where ships can directly berth to the jetty. This was the major port in 50’s when Goa – Mumbai ship service was in full stream. Over the time with advent of national highways and closure of ship services, Jaygad lost its glamour and now is a remote port.
 
Lighthouse situated in the fort guides ships traveling between Dabhol (near Dapoli) and Ratnagiri. With the proper development of this natural port, Jaygad can once again be the hub of marine activity and has the potential to become an alternative port to Mumbai. Its scenic location and natural port facility are the silent features of the Jaygad fort.

Sunday, November 21, 2010

किल्ले शिवनेरी

 किल्ले शिवनेरी-  "आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला" अशी स्थिती स्वराज्यात सर्वत्र असताना, किल्ले शिवनेरीवर एक वादळ जन्माला आले. हे वादळ होते उग्र विजांचे, हे वादळ होते स्वातंत्र्याचे, हे वादळ होते स्वाभिमानाचे आणि या वादळाचे नाव होते "शिवाजी", त्या वादळाला जन्म देणारी थोर माता होती "जिजाऊ".


अंगाई कोणतीही आई आपल्या मुलांसाठी गाते, परंतु आपल्या बछ्ड्याला स्वराज्याच्या शत्रुंबद्दल अंगाईतुन सांगणारी ती वाघिण एकच "जिजाऊ".


हिंदवी स्वराज्याचा सुर्योदय जेथे झाला तो हा किल्ले "शिवनेरी".

Saturday, November 20, 2010

किल्ले रायगड


रायगड - पूर्वी जिथे गडावर चढण्या-उतरण्याचे धाडस फक्त वारा आणि पाणी करू शकतात असा हा बेलाग किल्ला आणि स्वराज्याची राजधानी.
या गडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग म्हणजे "शिवराज्याभिषेक". महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान.
"किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन झळाळु लागले, भारतवर्षातील, इंद्रप्रस्थ, देवगिरी, चित्तोड, कर्नावती, विजयनगर, वारंगळ आणि अशाच भंगलेल्या सार्वभौम सिंहासनाच्या जखमा रायगडावर बुजल्या. हि भूमी राजश्रीराजविराजीतसकलसौभाग्य संपन्न झाली.
                                         "हे राज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा."
          "पूर्वेकडील जिब्राल्टर" अशी ज्याची पूर्वी ओळख होती तो दूर्गदुर्गेश्वर "रायगड". स्वराज्याची राजधानी. रायगडाचे घेरा इतका मोठा आहे कि संपूर्ण गड फिरण्यास/जाणुन घेण्यास दोन दिवसही अपुरे आहे.
           या गडाने अनुभवलेला अत्यंत दु:खद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. बखर म्हणते, "ते दिवस पृथ्वीकंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभूमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले." आजही शिवसमाधीचे दर्शन घेताना त्यांच्या या महान कार्याचा इतिहास डोळ्यासमोर आल्यावाचुन राहत नाही.

Monday, November 15, 2010

Greenery Seekers

Blog hit cross 300.!! :-))

 thanks a lot for support and suggestions..stay in touch..!

किल्ले सिंहगड

"आधी लगीन कोंडाण्याचे" अशी गर्जना करणारे नरवीर तानाजी यांच्या अचाट पराक्रमामुळे हा किल्ला इतिहासप्रसिद्ध झाला आहे. उदेभान राठोड हा त्यावेळेस कोंडाण्याचा सरदार होता. कोंडाणा जिंकण्याच्या इर्ष्येने तानाजी आणि उदेभान यांच्यात घनघोर युद्ध झाले. तानाजींची डाव्या हातातील ढाल तुटली. त्यांनी डाव्या हाताची ढाल करून उदेभानला लढा दिला. या लढाईत दोघे ठार झाले. शिवाजी महाराजांना तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेंव्हा ते म्हणाले, "गड आला, पण माझा सिंह गेला". तेंव्हापासुन कोंडाणा किल्ला सिंहगड म्हणुन प्रसिद्ध पावला.

Sunday, November 14, 2010

किल्ले रोहीडा


किल्ले रोहीडा
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर एक सुरेख घाटरस्ता आहे. या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीडखोऱ्यात बसलेला किल्ला म्हणजे 'किल्ले रोहीडा'. रोहीडा खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती त्यातली ४१ गावे भोर तालुक्यात मोडतात. रोहीडा हे खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते.


उंची - 3650 फुट ( ~1110 मीटर) जाण्याची वेळ - June to Feb.

Tuesday, November 9, 2010

सारसबाग दीपोत्सव २०१० video

This is first event organize by Greenery Seekers group. Please check the video of this event.

http://www.youtube.com/watch?v=1NjCoptev0A


Special thanks to our friend and cameraman Dhiraj Dhage .

Have a great day..!! :-))

Friday, November 5, 2010

Monday, November 1, 2010

कोराईगड (कोरीगड)

१६५७ मध्ये महाराजांनी कोराईगड लोहगड,विसापुर, तुंग-तिकोना या किल्ल्याबरोबर स्वराज्यात सामील करून घेतला, या व्यतिरीक्त इतिहासात याचा फारसा उल्लेख नाही. गडावरच्या कोराईदेवीवरूनच याचे नाव कोराईगड पडले असावे. गडावर आजही सहा तोफा सुस्थित आढळतात. त्यातील सर्वात मोठ्या तोफेचे नाव "लक्ष्मी".







Saturday, October 30, 2010

किल्ले लोहगड

नावाप्रमाणेच मजबूत आणि बुलंद असा किल्ला. १६५७ मध्ये कल्याण-भिवंडी परिसर शिवाजी महाराजांनी जिंकुन घेतल्यावर लोहगड स्वराज्यात सामील करून घेतला. १६६५ मध्ये पुरंदराच्या तहात लोहगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि १६७० मध्ये मर्द मावळ्यांनी तो परत स्वराज्यात परत आणला. गडावरचे बांधकाम बर्‍यापैकी सुस्थितीत आहे. गडावरच एक डोंगराची सोंड दिसते, तोच लोहगडावरचा प्रसिद्ध "विंचुकाटा".


                                                                        विंचुकाटा


                                                                         लोहगड






Friday, October 29, 2010

छत्रपती शिवाजी महाराज

सह्याद्री..!

इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच.

वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.

देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्‍या वेड्यांचा हा महाराष्ट्र.

अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवाजी महाराज". :-))

Thursday, October 28, 2010

:-)

या निसर्गानं लळा लावला असा असा की,

सुखदु:खाला परस्परांशी हसलो- रडलो.

आता तर हा जीवच अवघा, असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. :-))

Tuesday, October 26, 2010

Raireshwar - Nature Trek

रायरेश्वर पठार ऐतिहासिक ठिकाण
जिथे शिवाजी राजांनी स्वराज्याची शपथ घेतली, आणि अद्वितीय इतिहास घडवला,

निसर्ग रम्य ठिकाण
जिथे वाट जाते खळखळनार्या धबधबे, उंच वुक्षराजीतून,

जीविविधतेने भरपूर ठिकाण
जिथे अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, आनंदाने बागडतात,

दुर्मिळ रानफुलांनी बहरलेले पठार
जिथे निसर्गाने विविध रंगांची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. :-))

Monday, October 25, 2010

कनकदुर्ग-गोवागड

हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनार्‍यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड हे होय.

हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनार्‍यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.

हर्णेच्या किनार्‍यावर दक्षिणेकडे टेकडीवजा एक भुशिर घुसलेले आहे. या लहानश्या टेकडीवजा भुशिरावर कनकदुर्गचा किल्ला उभा आहे. कनकदुर्गाच्या पुर्व बाजुला मच्छिमारांच्या असंख्य नौका दिसतात. या नौकांमधे जाण्यासाठी कनकदुर्गाला लागुनच धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर जाण्यासाठी पुलासारखा रस्ता केलेला आहे. या रस्त्यावर चालत गेल्यावर कनकदुर्गाच्यावर जाण्यासाठी केलेल्या पायर्‍यांचा मार्ग आहे. या पायर्‍यांच्या बाजुलाच भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरुज म्हणजे कनकदुर्ग... हा पुर्वी किल्ला होता याचा साक्षीदार आहे. पायर्‍यांच्या मार्गाने आपण पाचच मिनिटांमधे कनकदुर्गावर पोहोचतो. गडाच्य माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्याअसून त्याभागात दिपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंतचा सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराची मधुन मधुन चमचमनारी किनार आणि सागराची गाज आपल्या मनाला धडकी भरवत रहाते. या पार्श्वभूमीवर दिमाखात उभा असलेला फुलपाखराच्या आकाराचा सुवर्णदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. उत्तरेकडै फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पुर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावरील गडपणाचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे आपली गडफेरी १५ ते २० मिनिटांमधे आवरते.

कनकदुर्गाकडून परत फिरल्यावर डावीकडील टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग असल्याची मनाची समजूत घालून पुढे निघावे लागते. मच्छिमारांच्या वस्तीने व्यापलेल्या फत्तेदुर्गावरचे अवशेष केव्हाच लुप्त झालेले आहे.

फत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्यदरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करुन आहे. हे भव्य प्रवेशव्दार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरुन आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरुन डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशव्दार आहे. हे प्रवेशव्दार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशव्दाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामधे किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार पाहून पुन्हा रस्त्यावर येवून नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामधे प्रवेश करावा लागतो. सध्या कोणा हॉटेल व्यवसायीकाने गडाचा ताबा घेतला आहे. त्याने दारावर चौकीही उभारली आहे. तेथील रखवालदाराची परवानगी घेवून किल्ल्यामधे जाता येते. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करुन त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमबाजुला सुवर्णदुर्गाचे दृष्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थमधे आहेत. त्यामधील एकात पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामधे महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नसल्यामुळे गड पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो.

जर आपण संध्याकाळच्या वेळेस येथे असू तर कनकदुर्गच्या किनार्‍यावरील मासळी बाजार अवश्य पहाण्याजोगा आहे. अर्थात खवय्यासाठीतर ही सुवर्णसंधीच होय.

Greenery Seekers!

रायगडाच्या बालेकील्यावरून दिसणारा सूर्योदय. राजगडाच्या संजीवनी माचीवरून अस्ताला जाताना दर्याची सुवर्णरेखा चमकावणारा सुर्यनारायण,.हरीश्चान्द्रगडाच्या कोकणकड्यावरून दिसणारे इंद्रवज्र.

कळसुबाई शिखराच्या खांद्यावरून वाहणारे निर्मल झरे आणि सोसाट्याचा वारा , राजमाचीच्या जुळ्या किल्यांवरून दिसणारे तळकोकणातील द्रुष्य ..सज्जनगडावरून सकाळी एकू येणारे मनाचे श्लोक आणि प्रसन घंटानाद ..

अपरिचित हिरव्या वाटेची शांतता ...हे फक्त अनुभवाचे क्षण ...त्यांना शब्दाच्या ओंझळीत पकडता येणार नाही..

न रुळलेल्या , हिरव्या - पिवळ्या , फुलांनी नटलेल्या पाऊलवाटेवरून भटकताना निसर्गाच्या नवंनवीन रूपांचे दर्शन घडते ...

मराठेशाहीचा पाया रचणाऱ्या पवित्र शिवचरणाना स्मरून अशा सुंदर अनुभवांना सामोरे जाणाऱ्या डोंगर भटक्यांसाठी , छायाचित्रकारांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत Greenery Seekers ...एक आनंदयात्रा ... :-))